शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांचा घोळ कायम!

By admin | Published: September 22, 2014 1:23 AM

अकोला जिल्हा परिषदेतील प्रकार: अधिका-यांच्या दोन बैठकाही ठरल्या निष्फळ.

अकोला: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामे पूर्ण झाल्याची माहिती जुळत नसल्याने, यासंदर्भात शुक्रवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांच्या दोन बैठकाही निष्फळ ठरल्या. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांचा घोळ कायमच आहे.जवाहर विहिर योजना आणि धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत विहिरी महात्मा गाधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत वर्ग करून, सिंचन विहिरींची अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी दिल्या जाणार्‍या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत गेल्या २३ जानेवारीला घेतला. या निर्णयानुसार सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी अनुदानाची रक्कम १ लाख ३0 हजारांवरून अडीच लाखांपर्यंत करण्यात आली. त्यानुषंगाने जिल्ह्यातील १ हजार ५१५ सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी गेल्या मार्चमध्ये शासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झालेला अडीच कोटींचा निधी जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाला वितरित करण्यात आला होता. दरम्यान, सिंचन विहिरींच्या कामांचा आढावा राज्याचे रोहयो खात्याचे प्रधान सचिव व्ही.गिरीराज यांनी गत बुधवारी सिंचन वहिरींच्या अपूर्ण कामांपैकी किती कामे पूर्ण झाली, यासंदर्भात परिपूर्ण माहिती सादर करण्यात आली नसल्याच्या मुद्यावर रोहयो खात्याच्या प्रधान सचिवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोद दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांपैकी पूर्ण झालेल्या कामांची माहिती घेण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी शनिवारी सकाळी आणि सायंकाळी लघुसिंचन विभाग, सातही पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी आणि संबंधित यंत्रणांच्या अधिकार्‍यांच्या दोन बैठका घेतला. मात्र सिंचन विहिरींची अपूर्ण कामे आणि त्यापैकी पूर्ण झालेली कामे, याबाबत तालुकानिहाय माहितीचा ताळमेळ जुळला नसल्याने, या दोन्ही बैठका निष्फळ ठरल्या. त्यामुळे जिल्ह्यातील सिंचन विहिरींच्या अपूर्ण कामांचा घोळ कायमच असल्याचे चित्र आहे.