अकोल्याची जत्रा परिवारातर्फे वृक्ष लागवड
अकोला : अकोल्याची जत्रा परिवारातर्फे गोरक्षण रोडवरील ‘साई पार्क’ याठिकाणी श्रमदान करून वृक्ष लागवड करण्यात आली. साई पार्कमधील प्लास्टिक व इतर कचऱ्याची स्वच्छता करून प्रत्येक सदस्यांतर्फे एक झाड आणून याठिकाणी लावण्यात आले. यावेळी अकोल्याच्या जत्रेच्या राजश्री देशमुख, हेमलता वरोकार, शरद वानखडे, अजय गावंडे, किशोर बळी, नरेंद्र चिमणकर, कल्पना देशमुख, संध्या देशमुख, देवश्री ठाकरे, अनिता कवडे, श्यामराव देशमुख, प्रदीप गुरुखुद्दे, किरण विसपुते, मयूर जोशी, सीमा वानखडे, दीपाली बळी, भाग्यश्री झटाले, विशाल मोरे, जय ठोसर व चंद्रकांत झटाले उपस्थित होते.
७२ तासांची अट जाचकच!
अकोला : जिल्ह्यात गत चार दिवसांआधी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला असला तरी ७२ तासांच्या आत नुकसान नोंदवावे, अशी अट घातली आहे. या अत्यल्प कालावधीत पीकविमा कंपन्यांकडे अर्ज करणे शक्य नाही. त्यामुळे ही अट जाचकच असल्याचे दिसून येत आहे.