अकोला : नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५ हजार १९० शेतकरी व गटांना लाभ मिळाला होता. विविध स्तरांवर मंजुरीसाठी असलेल्या अर्जांना मंजुरी मिळाली आहे. आता हा आकडा वाढला आहे. प्रलंबित अर्ज संख्येत कमी झाली आहे.
-------------------------------------------------------
बाजार समित्या बंदचा शेतकऱ्यांना फटका
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाने वर्ष उलटल्यानंतरही त्याची धग कायम आहे. लॉकडाउनच्या नावानेही आता अंगावर काटा उभा राहतो. वर्षभरानंतरही या संकटातून सावरू शकलो नाही. आता तर कोविड विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या व ग्रामीण भागातील बाजार बंद आहेत. त्याचा फटका शेवटी भाजीपाला उत्पादकांना बसला आहे.
-----------------------------------------------------
४० हजार क्विंटल बियाण्यांची मागणी
अकोला : जिल्ह्यात सातही तालुक्यांत सोयाबीनचे लागवड क्षेत्र वाढत आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ५५८ हेक्टर सोयाबीनचे सरासरी लागवड क्षेत्र आहे. त्यात येणाऱ्या खरीप हंगामात वाढ होऊन हे क्षेत्र सरासरी २ लाख १२,७०० हेक्टर होण्याची शक्यता आहे. याकरिता कृषी विभागाने शासनाकडे ३३ हजार ९९९ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी केली.
------------------------------------------------------
उड्डाणपुलाच्या कामाला वेग
अकोला : डाबकी रोडवरील रेल्वे क्रॉसिंगवरून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने वेग धरला आहे; परंतु पुलाखालील रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांचे हाल होत आहे. खड्डेमय रस्ता व धूळीने वाहनधारक त्रस्त झाले. या पुुलाचे काम लवकर पूर्ण झाल्यास वाहनधारकांची गैरसोय टळणार आहे.
-------------------------------------------------------
वाढत्या उन्हाचा फळांना फटका
अकोला : जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढला आहे. तापमान ४२ अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम फळपिकांवर जाणवू लागला आहे. फळांचा दर्जा घसरल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्ग चिंतेत आहे. कमी दर्जाची फळे घेण्यास ग्राहक पुढे येत नाही. माल विकायला आणल्यास पडलेल्या किंमतीमध्ये मागणी होत आहे.
---------------------------------------------------------