परिसरातील काही रुग्ण शासकीय रुग्णालयात थेट जात आहेत, तर काही खासगी दवाखान्यात जात असल्यामुळे पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णाची नोंद नाही. जवळच्या खेरडा खुर्द, निंबी येथे ब्लॅक फंगसची लागण झाल्याची माहिती आहे. काही रुग्ण उपचार करून घरी परतले, तर काही खासगी किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन उपचार करीत आहेत. रुग्णांनी घाबरून न जाता शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
ब्लॅक फंगस आजारावर सर्वोपचार रुग्णालयात व्यवस्थित उपचार होतो. पिंजर परिसरातील रुग्णांनी पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार करून घ्यावा.
- डॉ. शरयू बिहाडे, वैद्यकीय अधिकारी पिंजर