अकाेला कारागृहात शिक्षा भाेगत असलेल्या बंदीजनांच्या पाल्यांना शिक्षण व संगाेपनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत हे अनुदान ४२५ रुपये दिले जात हाेते आता ते ११०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
सीसीआयने अवैध कर्जवुसली थांबवावी
अकाेला शेतकऱ्यांनी सीसीआयला विकलेल्या कापसाची रक्कम परस्पर कर्ज खात्यात वळती करण्याचा प्रकार केला जात आहे. ही अवैध कर्जवसुली असून ती त्वरित थांबवावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी वंचितचे उपाध्यक्ष डाॅ. धैर्यवर्धन पुंडकर, प्रदीप वानखडे, ज्ञानेश्वर सुलताने, पराग गवई आदी उपस्थित हाेते.
एनसीसी विद्यार्थांनी राबविले स्वच्छता अभियान
अकाेला येथील शिवाजी महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी टिळक पार्क परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी प्राचार्य डाॅ. रामेश्वर भिसे, डाॅ. आनंद काळे, डाॅ. अश्विनी बलाेदे यांच्या मार्गदर्शनात आनंद भगत, साक्षी नवलकार, रितेश गव्हाणे, पूनम जावळे, प्रीती ठाकूर, साक्षी देवकर, समीक्षा राऊत आदींनी सहभाग घेतला.
एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित!
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन गत वर्षभरापासून अनियमित होत असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. गत वर्षभरात अनेकदा कर्मचाऱ्यांना महिन्याच्या शेवटी वेतन दिले जाते. अनियमित वेतनासंदर्भात गुरुवारी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
वाळू घाटांचा लिलाव करा
अकाेला वाळू घाटांचा लिलाव न केल्यामुळे सध्या अवैध रेतीची माेठ्या प्रमाणात विक्री हाेत आहे, तसेच अवैधरीत्या रेतीचा उपसाही केला जात आहे. हे थांबविण्यासाठी वाळू घाटांचा लिलाव करून घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याची मागणी हाेत आहे.
ग्रामीण भागातील बसफेऱ्या अनियमित
बाेरगावमंजू : लॉकडाऊन दरम्यान बंद असलेली एसटी बससेवा पुन्हा सुरू झाली, मात्र अजूनही अनेक ग्रामीण भागात बसफेऱ्या अनियमित सुरू आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनाही बसत आहे. ग्रामीण भागात नियमित बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.