------------
ढाेणे महाराजांचा सत्कार
शिर्ला : येथील श्री क्षेत्र सोमपुरी महाराज संस्थान ते श्री क्षेत्र कौंडण्यपूर पायदळ पालखी सोहळ्याची सांगता झाली. समारोपीय कार्यक्रमात काल्याचे कीर्तन भागवताचार्य महादेव महाराज निमकंडे यांनी केले. यावेळी पायदळ दिंडीत सहभागी होणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. ह. भ. प. ढोणे महाराज यांचा सोमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव वीरपिता काशीराम निमकंडे यांनी सत्कार केला.
-----------
पिंपरडोळीला डोंगरी विभागाचा दर्जा देण्याची मागणी
पातूर : पातूर तालुक्यातील पिंपरडोळी गाव अतिशय दुर्गम डोंगराळ भागात वसलेले आहे. गावामध्ये अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास समाजाचे लोक राहात असल्याने पिंपरडोळीला डोंगरी विभागाचा दर्जा देण्याची मागणी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे दीपक माणिकराव ताजणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
.....................