ऑनलाइन लोकमतअकोला, दि. 17 : कृषी पंपांसाठी वीज जोडण्या देण्याला पूर्वीच्या तुलनेत गती आली असली, तरी जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वीज जोडण्यांसाठी अर्ज येत असल्यामुळे, महावितरणकडे तब्बल आठ हजारांवर अर्ज प्रलंबित आहेत.
महावितरणकडून जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी वीज जोडण्या देण्यात येतात. जिल्ह्यात आजमितीस ५५ हजारांपेक्षाही अधिक कृषीपंप धारक आहेत. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून वीज जोडण्यांसाठी अर्ज केले जातात. गत वर्षभरात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. गत वर्षी महावितरणकडून जिल्ह्यातील ५ हजारापेक्षां अधिक शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्यात आल्या.
धडक सिंचन योजनेअंतर्गत मंजुर झालेल्या विहिरींसाठी तातडीने वीज जोडण्या देण्यात आल्या. आता रब्बी हंगामास सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजेचे गरज भासत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने वीज जोडण्यांसाठी अर्ज येत आहेत. आज रोजी महावितरणकडे ८५०० अर्ज प्रलंबित आहेत. तेल्हारा, आकोट, बार्शीटाकळी, पातुर या तालुक्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र अधिक असल्यामुळे या तालुक्यांमधून वीज जोडण्यांसाठी अर्ज येत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रलंबित अर्जांची संख्या वाढतच आहे.
परिमंडळात दिल्या २५ हजार जोडण्यागत वर्षभरात शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी वीज जोडण्या देण्याला गती आली आहे. महावितरणच्या अकोला परिमंडळात येत असलेल्या अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात गत वर्षी तब्बल २५ हजार वीज जोडण्या देण्यात आल्या.