महिनाभराचा काळ कसोटीचा
आगामी महिनाभराचा काळ हा कसोटीचा आहे. त्यामुळे सर्व यंत्रणेने अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या सुपर स्प्रेडर व्यक्ती, रुग्णसंख्या अधिक असलेला परिसर, सहव्याधी असणारे ज्येष्ठ नागरिक, पॉझिटीव्ह रुग्णांच्या निकट संपर्कातील तसेच त्यांच्या संपर्क साखळीतील लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे. दिवसाला किमान २४०० चाचण्या करण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या हातावर शिक्के
होम आयसोलेशन मधील रुग्णांची ओळख पटावी, या दृष्टिकोनातून त्यांच्या हातावर शिक्के मारण्याचेही निर्देश त्यांनी बैठकीत दिले. तसेच त्यांच्या प्रकृतीचे नियमीत निरीक्षण आणि त्यांच्या औषधोपचाराचा पाठपुरावा झालाच पाहिजे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. संदिग्ध रुग्णांचे रॅपिड चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यावरही त्यांचा पाठपुरवा करून त्यांना निरीक्षणात ठेवण्याबाबत सुचना देण्यात आल्यात.