अकोला, दि. २३- महापालिका क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत उभारल्या जाणार्या वैयक्तिक शौचालयांच्या बांधकामाची गती वाढविण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी आयुक्त अजय लहाने यांना बैठकीत दिले. ह्यअमृतह्ण योजनेसह विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नगरविकास विभागात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.केंद्र शासनाच्या ह्यस्वच्छ भारतह्णअभियानाच्या धर्तीवर राज्य शासनाने ह्यस्वच्छ महाराष्ट्रह्ण अभियान सुरू केले. शहरात निर्माण होणारा कचरा, घाणीला आळा घालण्यासाठी शासन आग्रही आहे. उघड्यावर शौच करण्याच्या प्रकारावर कायमस्वरूपी बंदोबस्त म्हणून वैयक्तिक शौचालय उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मनपा प्रशासनासमोर १0 हजार ७७८ शौचालयांचे उद्दिष्ट असून, हद्दवाढीमुळे शहरालगतच्या भागातदेखील शौचालय उभारण्याचे काम सुरू होणार आहे. ह्यअमृतह्ण योजनेसह विविध कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. शौचालयांच्या उभारणीची संथ गती पाहता, महापालिकेने बांधकामाची गती वाढविण्याचे निर्देश प्रधान सचिवांनी दिले. पाणीपुरवठा वितरण प्रणालीसह पंतप्रधान आवास योजनेचाही यावेळी आढावा घेण्यात आला.२ ऑक्टोबरपर्यंत होती मुदतह्यस्वच्छ महाराष्ट्रह्ण अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी महापालिकेला २ ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. शासनाने दिलेल्या मुदतीत शौचालय उभारणीचे काम शक्य नसल्याची परिस्थिती आहे. यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शौचालय उभारणीसाठी आणखी एक महिन्याचा कालावधी वाढवून दिल्याची माहिती आहे.
शौचालयांच्या कामाची गती वाढवा!
By admin | Published: September 24, 2016 3:06 AM