अकोला: शेतांना समृद्ध करायचे असेल तर जैवखते, तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा लागणार असल्याचे आवाहन गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. सी. पटेल यांनी केले. ते म्हणाले, जे अशक्य आहे ते शक्य करणारे शास्त्रज्ञ आहेत. म्हणून येत्या काळात कृषी शास्त्रज्ञांवर मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात १५ व १६ मार्च रोजी सौर ऊर्जा कौशल्य विकास विषयावर आंतरराष्टÑीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. एस. धवन, आयसीएआरच्या एनएएचईपीचे राष्टÑीय समन्वयक डॉ. आर. बी. शर्मा, इंडियन सोसायटी आॅफ अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष मा. पा. इंद्रमनी, डॉ. पंकज पाठारे (ओमान), डॉ. पंदेकृविचे कुलसचिव डॉ. पी. आर. कडू, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे व डॉ. सुरेंद्र काळबांडेयांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. पटेल यांनी अक्षय ऊर्जा स्रोतांतर्गत गुजरात राज्यात उत्तम काम सुरू असून, शेतकऱ्यांना या ऊर्जेचा लाभ होत आहे. शेतीला लागणाऱ्या विजेची गरज यातून भागत असल्याने शेती उत्पादनात चांगलीच वाढ होत आहे. याला जोड म्हणून जैवखते व्यवस्थापनावर भर देऊन विषमुक्त अन्न निर्मितीवर भर देत असल्याचे सांगितले. जैवखते, कृषी अवजारे निर्मिती, अल्गीपासून बायोफ्युएल निर्मिती यासारख्या उद्योगाच्या संधी असून, मधमाशीपालन, त्यापासून सहद, फुलशेती कृषी आधारित उद्योगाचे पर्याय असल्याने शेतकऱ्यांनी याकडे वळण्याचे आवाहन केले. कुलगुरू डॉ. धवन यांनी मराठवाडा, विदर्भातील समस्या सारख्या असून, कृषी विद्यापीठाने कृषी उद्योग निर्मितीसाठी शेतकºयांना प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. उद्योग निर्मितीत ही महत्त्वाची बाब असल्याचे ते म्हणाले. कुलगुरू डॉ. भाले यांनी हरितक्रांतीत कृषी अभियांत्रिकीची भूमिका मोलाची असल्याचे सांगताना सौर, वायू तथा बायोमासद्वारे ऊर्जा निर्मितीत वाढ करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. इथेनॉल निर्मिती एक उत्तम पर्याय असून, कृषी आधारित उद्योगासाठी एक चांगला पर्याय आहे. कृषी क्षेत्रात भरपूर उद्योगाच्या संधी असल्याने विद्यार्थ्यांनी नोकरीच्याच मागे न लागता, कृषी उद्योग तयार करू न रोजगार निर्मिती करावी, त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरू कता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.