जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाद्वारे ‘व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभागाचे’ ऑनलाईन आढावा सभेप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. दोन दिवस झालेल्या या आढावा सभेमध्ये सर्व तालुक्यातील साधन व्यक्ती विषय तज्ञ विशेष शिक्षक सहभागी झाले होते. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेचे संचालक दिनकर टेमकर यांचे अनुभवी मार्गदर्शनात तथा व्हीजीपीजी विभाग प्रमुख दिपक माळी यांचे नेतृत्वात राज्यभर महाकरियर पोर्टलचा प्रभावी वापर होत विद्यार्थ्यांना शैक्षणिक व करिअर विषयक अमर्याद संधींची उपलब्धता होत असल्याबद्दल राज्य समन्वयक श्याम राऊत यांनी सर्वच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांचे आभार व्यक्त केले. व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन विभागाच्या प्रमुख प्रेरणा मोरे यांनी मार्गदर्शन केले. आढावा सभेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा समुपदेशक निता जाधव बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा समुपदेशक श्रीमंत पद्मन यांनी केले.
पोर्टलची उपयोगिता वाढवत जिल्ह्याचा लौकिक वाढवा - नागरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:17 AM