अजय डांगे/अकोलापुरोगामी महाराष्ट्रात महिला अत्याचारात वाढ झाल्याचे गत वर्षभरातील आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. सन २0१२च्या तुलनेत २0१३ मध्ये छेडखानीच्या गुन्ह्यात ११0 टक्के, बलात्कार- ६६ टक्के, महिला व तरुणींचे अपहरण-८५.९६ टक्के आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात ८१.१७ टक्के वाढ झाली आहे. दिल्ली येथे घडलेल्या ह्यनिर्भयाह्ण प्रकरणानंतर महिलांवर अत्याचार करणार्यांना जन्माची अद्दल घडावी, यासाठी सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केल्या; मात्र तरीही महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झाले नसल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमुख महानगरांत २0१३मध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात सन २0१२च्या तुलनेने २0१३ मध्ये वाढ झाल्याचे आकडेवर नजर टाकल्यास दिसून येते. बलात्काराचे गुन्हे २0१२मध्ये ६0५ तर २0१३मध्ये १ हजार ९ घडले. २0१२ मध्ये महिला व तरुणींच्या अपहरणाचे गुन्हे ४१३ तर २0१३ मध्ये ७६८ गुन्हे घडले. २0१२मध्ये छेडखानीचे १ हजार २८४ तर सन २0१३मध्ये २ हजार ६९९ गुन्ह्यांची नोंद झाली. २0१२मध्ये लौंगिक शोषणाचे ४९४ तर २0१३मध्ये ८९५ गुन्हे दाखल करण्यात आले. पती व नातेवाईकांकडून विवाहितेच्या छळाचेही प्रमाण वाढले असून, २0१२मध्ये १ हजार ८४ तर २0१३मध्ये २ हजार १५९ गुन्हे दाखल करण्यात आले. २0१२ मध्ये हुंडाबळीचे गुन्हे ४२ तर २0१३मध्ये ७१ घडले होते. महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी सामाजिक, पुरुषी मानसिकता बदलणे आवश्यक आहे. अत्याचार थांबण्यासाठी प्रत्येक समाजघटकाने प्रबोधन करणे आणि जबाबदारीने वागणेही गरजेचे असल्याचे मत राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ. आशा मिरगे यांनी लोकमतशी बोलताना नोंदविले.*सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ४औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पूणे, सोलापूर, ठाणे या पोलिस आयुक्तालय असलेल्या प्रमख महानगरांमध्ये २0१२च्या तुलनेत २0१३मध्ये सर्वच गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. २0१२ मध्ये या महानगरांमध्ये ७९ हजार १४८, तर २0१३मध्ये ८८ हजार ८२२ दखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. दोन वर्षात गुन्ह्यांमध्ये १२. २२ टक्के वाढ झाली. खुनाचा प्रयत्न- ८.३१ टक्के, दरोडा-११.५६, लुटमार-५0.७0, चोरी-१.४५, दंगल-५.५४ आणि फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये १४.४१ टक्के वाढ झाली. खुनाच्या गुन्ह्यामध्ये मात्र ७.१४ टक्क्यांनी घट झाली.
राज्यात महिला अत्याचारात वाढ
By admin | Published: December 03, 2014 11:37 PM