शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लहान मुलांमध्ये वाढले सर्दी, तापाची लक्षणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 10:45 AM

Increased cold, fever symptoms in young children : पालकांनी घाबरून न जाता बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून केले जात आहे.

अकोला : जिल्ह्यात बालकांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी असले, तरी अनेक बालकांमध्ये सर्दी, तापाची लक्षणे आढळून येत आहेत. कोविडसदृश लक्षणे असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, मात्र पालकांनी घाबरून न जाता बालरोगतज्ज्ञाचा सल्ला घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून केले जात आहे. शिवाय, कुटुंबातील प्रत्येक सदस्याने नियमित मास्कचा वापर करून इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच नियमित हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करत मुलांना जपण्याचेही आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरू असताना लहान मुलांमध्येही खोकल्यासह तापाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लहान मुलांच्या दवाखान्यांमध्ये गर्दी वाढली असून अनेक पालक कोरोनाच्या भीतीपोटी भ्रमणध्वनीद्वारेच डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. राज्यातील काही भागात १० वर्षांखालील मुलांनाही कोराेनाची लागण झाल्याचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लहान मुलांसाठीदेखील कोरोनाचा धोका वाढत आहे. गत मार्च महिन्यात जिल्ह्यातील कोविड बाधित रुग्णांमध्ये केवळ एका बालकाचा समावेश असला, तरी अनेक बालकांमध्ये कोरोनाचे लक्षणे आढळून आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास बालकांना सर्वांपासून वेगळे ठेवण्याची वेळ येईल या भीतीपोटी पालकही बालकांच्या कोविड चाचणीला टाळत असल्याचे चित्र दिसून आले. ही स्थिती पाहता बालकांनाही कोरोनाचा धोका कायम असून पालकांनी आवश्यक काळजी घेण्याची गरज आहे.

 

काय आहेत लक्षणे

 

अनेक बालकांना सर्दी, ताप, खोकला, हगवण आदी लक्षणे आढळून येतात. बालकांमध्ये ही लक्षणे आढळताच पालकांनी त्यांना तत्काळ बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, बालकांमधील या समस्या नेहमीच्याच औषधांनीच सुटत असल्याने पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र या लक्षणांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

 

तर ‘कावासाकी’ आजाराचाही धोका

कुटुंबात कुणाला कोरोना होऊन गेल्यानंतर लहान बालकांमध्ये गोवराची लक्षणे आढळल्यास किंवा अंगावर चट्टे येणे, तोंड येणे, डोळे येणे आदी लक्षणे आढळल्यास बालकांना कावासाकी हा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत पालकांनी तत्काळ बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

त्रिसूत्रीचे पालन करणे शिकवा

लहान मुलांना कोरोनासह इतर विषाणूजन्य आजारापासून बचावासाठी त्रिसूत्रीचे पालन करण्याचे मार्गदर्शन पालकांनी करावे. यामध्ये प्रामुख्याने मास्क कसा घालावा, इतरांपासून सुरक्षित अंतर कसे राखावे तसेच वारंवार साबणाने स्वच्छ हात धुणे आदींचे मार्गदर्शन करावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, त्याचा परिणाम लहान बालकांवरही होत आहे. अनेक बालकांमध्ये सर्दी, ताप, खोकल्यासह हगवण आदी लक्षणे आढळून आली आहेत, मात्र पालकांनी यामुळे घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याची गरज आहे. अशी लक्षणे दिसताच बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच घरात कुणाला कोरोना होऊन गेल्यावर बालकांमध्ये गोवर, तोंड येणे, डोळे येणे आदी लक्षणे आढळल्यास कावासाकी या आजाराचा धोका असून शकतो. त्यामुळे विशेष दक्षता घेण्याची गरज आहे.

- डॉ. अनुप चौधरी, बालरोगतज्ज्ञ, मनपा आरोग्य विभाग, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य