कोरोना संसर्गासाठी मार्च महिन्यात शासनाने लॉकडाऊन जारी केले. लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी होत असताना कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी नागरिकांचे फिरणे बंद झाले होते. त्यात संधीवातासह इतर अस्थिरोग आणि वृद्धांचा समावेश होता. दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसणे आणि उपचार करणे शक्य न झाल्याने या रुग्णांत गुडघेदुखीची समस्या वाढली. अस्थिरोग तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत गुडघेदुखीच्या रुग्णांत पुरुषांचे प्रमाण ५० ते ६० टक्के, महिलांचे प्रमाण २५ ते ३० टक्के, युवकांचे प्रमाण १० टक्के असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. हिवाळ्याच्या दिवसात हे प्रमाण अधिकच वाढण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.
--------
कॅल्शियमयुक्त आहारावर द्या भर
संधीवाताच्या आजारासह शरीरात कॅल्शियमची मात्रा कमी झाल्याने गुडघेदुखीचा त्रास वाढतो. गुडघेदुखीचा त्रास असलेल्या रुग्णांंनी आपल्या दैनंदिन आहारात कॅल्शियम देणारी जीवनसत्वे घेणे गरजेचे आहे. त्यात मुळा, गाजर, मेथीसह इतर भाजीपाल्यांचे सेवन करून वेळोवेळी तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेणे, ऊबदार कपडे वापरून चालण्याचा नियमित हलका व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे. रुग्णांनी हिवाळ्यात अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन अस्थिरोग तज्ज्ञांकडून केले जात आहे.
फिरण्यावरील मर्यादा त्रासाला कारणीभूत
लॉकडाऊनच्या काळात कोरोना संसर्ग आणि प्रशासनाच्या कठोर अमलबजावणीमुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते. शिवाय सार्वजनिक कार्यक्रमांवरही मर्यादा होत्या, तसेच क्रीडांगणे, विरंगुळ्याची ठिकाणेही बंद करण्यात आली होती. त्यामुळे गुडघेदुखीचे आजार असलेल्या व्यक्तींना चालता-फिरता आले नाही. वेळेवर उपचार करणेही त्यांना शक्य झाले नाही. याच कारणांमुळे गुडघेदुखीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून, हिवाळ्याच्या दिवसांत थंडीमुळे हा त्रास आता अधिकच वाढला आहे.
आधी लॉकडाऊनमुळे संधीवात असलेल्यांसह वृद्धांना चालता-फिरता आले नाही. त्यात आता थंडीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी गुडघेदुखीचा त्रास जास्त वाढला आहे. यात पुरुषांचे प्रमाण ५० ते ६० टक्के आहे.
डॉ.
अस्थिरोग तज्ज्ञ अकोला.