शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

‘अंडवृद्धी’ आजाराचा वाढता धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 2:42 PM

थमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोल्यातील ११ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अंडवृद्धी म्हणजेच ‘हायड्रोसील’ हा आजार नेहमीच दुर्लक्षित असल्याने या आजाराने ग्रस्त रुग्ण संख्या वाढत आहे. अनेकांना या आजाराविषयी माहिती नसल्याने त्याकडे रुग्णांकडूनही दुर्लक्षकेले जाते; पण अंडवृद्धीचा वाढता धोका लक्षात घेता आरोग्य यंत्रणेंतर्गत राज्यभरात अंडवृद्धीग्रस्त रुग्णांची विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात अकोल्यातील ११ रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.वाढत्या वयासोबतच पुरुषांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या उद््भवतात. या समस्यांपैकीच एक गंभीर समस्या ‘हायड्रोसील’ म्हणजेच अंडवृद्धी ही आहे. सर्वसाधारणत: या आजाराकडे रुग्ण दुर्लक्ष करत असल्याने अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. या आजाराचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी केंद्र शासनाने धोरण आखले असून, त्यानुसार राज्यातील सर्वच अंडवृद्धी रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर अंडवृद्धी रुग्णांची शोध मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मोहिमेंतर्गत जिल्हा हिपताप अधिकारी कार्यालयांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात गोरेगाव व माझोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ११ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले.काय आहे अंडवृद्धी आजार?

  • ‘हायड्रोसील’ म्हणजेच अंडवृद्धी नावाचा आजार
  • वयाची ४० वर्षे पूर्ण केल्यानंतर पुरुषांच्या ‘स्क्रोटम’ म्हणजेच अंडकोष पिशवीमध्ये हा आजार होतो.
  • यामध्ये फ्लुइड भरलेले असते. एखाद्या कारणामुळे हे फ्लुइड टेस्टिकलच्या बाहेर जमा झाले, तर अंडवृद्धीची होण्याची शक्यता असते.
  • परिणामी अंडकोष पिशवी मोठी होऊन यामध्ये तीव्र वेदना होतात.

ही आहेत आजाराची कारणे

  1. अंडकोषाला दुखापत होणे
  2. नसांमध्ये सुजन
  3. आनुवंशिक कारण
  4. भारी वजन उचलणे
  5. लघवी रोखण्याची सवय

अंडवृद्धी रुग्ण तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून, ही राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर राबविण्यात येत आहे. मोहिमेंतर्गत या आजाराने पीडित रुग्णांचा उपचार करण्यात येणार असून, आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात मात्र अंडवृद्धीचे रुग्ण कमी असल्याने आजारावर लवकर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.- डॉ. विवेक पेंढारकर, जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य