दृष्टी कमी झाली, मात्र डोळा गमावला नाही
म्युकरमायकोसिसच्या १२६ शस्त्रक्रियांपैकी एकही शस्त्रक्रिया डोळ्याशी निगडीत नाही. या सर्व शस्त्रक्रिया सायनस व जबड्याच्या आहेत. डोळ्यांशी निगडीत रुग्णांवर इंजेक्शनच्या माध्यमातूनच यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांचे डोळे सहीसलामत राहीले. मात्र, त्यांची दृष्टी कमी झाल्याची माहिती नेत्रतज्ज्ञ डॉ. भावेश गुरुदासानी यांनी दिली.
अशी आहे जिल्ह्यातील स्थिती
स्क्रिनिंग १८५
मृत्यू - १५
शस्त्रक्रिया - १२६
दाखल रुग्ण - ७५
डिस्चार्ज - ७४
सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या १२६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर ७४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी म्युकरमायकोसिसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला