कोरोनाचा दोन प्रकारे हल्ला
अप्पर रिस्पेरेक्टर
बहुतांश रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा हल्ला हा अप्पर रिस्पेरेक्टर म्हणजेच घशापर्यंतच झालेला असतो. त्यामुळे त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे असतात. अशा रुग्णांच्या फुफ्फुसापर्यंत कोरोना विषाणू पोहोचत नसल्याने त्यांना जास्त धोका नसतो.
लोअर रिस्पेरेक्टर
प्रामुख्याने ५० वर्षावरील व्यक्ती किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे,अशा व्यक्तींमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लोअर रिस्पेरेक्टर म्हणजेच फुफ्फुसांपर्यंत झालेला असतो. त्यामुळे फुफ्फुसाच्या ल्युकस लेअरला बाधा होऊन न्युमोनिया तयार होतो. न्युमोनियाचे प्रमाण वाढल्यास ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. ८० टक्के लोकांचा न्युमोनिया बरा होत असला, तरी फुफ्फुसाची लवचिकता कमी होते. परिणामी ऑक्सिजन शोषण्याची क्षमता कमी होते.
अशी राखा फुफ्फुसांची निगा
मॉर्निंग किंवा इव्हिनिंग वॉक
सायकलिंग
जोरोने श्वास घेणे
काही सेकंद श्वास रोखून ठेवणे
छातीच्या मसल्सचे हलके व्यायाम
शक्य असल्यास धावणे
प्राणायम करणे
खानपानावर द्या लक्ष
धूम्रपानासह अॅसिडिटीमुळे फुफ्फुसातील म्युकस लेअर खराब होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे दम लागणे, कफ होणे, खोकला, अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे धूम्रपान टाळलेलेच बरे. शिवाय आहारामध्ये अॅन्टी ऑक्सिडंट घटक असलेल्या भाजीपाला, फळांचे सेवन करावे.
शरीरातील अवयव निरोगी असतील, तरच आपण निरोगी जीवन जगू शकतो. कोरोना काळात तर हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने फुफ्फुसाला निरोगी ठेवण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. विशेषत: जे रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. फुफ्फुसांची क्षमता वाढविण्यासाठी स्पायरोमॅट्री, पल्मोनरी रिहॅबिलिटेशन हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम केल्यास कोरोनामुळे झालेल्या क्षतीतून लवकर बरे होऊ शकतो.
- डॉ. सागर थोटे, छाती रोग व फुफ्फुस रोग तज्ज्ञ, अकोला