खेट्री: पातूर तालुक्यातील पहाडसिंगी येथील गरजू लाभार्थीं घरकुलाच्या लाभापासून वंचित असल्याने ग्रामस्थांनी पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांना दि. ३० ऑगस्ट रोजी निवेदन देऊन लाभ देण्याची मागणी केली. तसेच दिलेल्या निवेदनातून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. संबंधित अधिकाऱ्यांकडून दखल न घेतल्याने सोमवार, दि.२७ सप्टेंबरपासून पातूर येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर पहाडसिंगी येथील ग्रामस्थ बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
पहाडसिंगी हे गाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच अतिदुर्गम भागात असल्याने गावात बहुसंख्य ग्रामस्थ शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत तसेच पहाडसिंगी गाव माजी पालकमंत्री रणजित पाटील यांनी दत्तक घेतले होते. लाभार्थी पात्र असूनही हेतूपुरस्पर लाभार्थ्यांना वंचित ठेवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे. सध्या हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असला, तरी घरकुलापासून वंचित असलेल्या संतप्त लाभार्थी भर पावसाळ्यात पातूरचे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सोमवार दि.२७ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहेत.
------------------------
घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात घोळ करून गरजू लाभार्थ्यांना हेतूपुरस्पर वंचित ठेवले. श्रीमंत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. याची चौकशी करण्याची मागणी करीत वारंवार तक्रार केली, परंतु संबंधितांकडून दखल न घेतल्याने सोमवार दि.२७ सप्टेंबरपासून पातूरचे गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहे.
राहुल गवई, ग्रामस्थ पहाडसिंगी.
260921\img20210827182215.jpg
बेमुदत आमरण उपोषण