लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: समाजात अंधत्वा विषयी बरेच गैरसमज आहेत की, सगळ्य़ा अंध व्यक्तिंना नेत्रदानाचा फायदा होतो, या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम वेगळा असतो, परीक्षा ब्रेललिपी मध्ये देतात, विद्यार्थी विशेष शाळा-महाविद्यालयातच शिक्षण घेतात आदी. दुसर्या बाजूला ग्रामीण भागातल्या अंध विद्यार्थ्यांमध्ये आहार, आरोग्य, व्यायाम, करिअर अशा अनेक गोष्टींबद्दल अज्ञान आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवासापर्यंत पोहचू शकत नाही. ही तफावत व गैरसमज दूर होण्याच्या उद्देशाने इंद्रधनु जागृती शिबिराचे आयोजन अकोला येथील गीता नगरमधील भरतिया भवन येथे २३ ते २५ डिसेंबर याकालावधीत केले असल्याची माहिती आयोजन समितीचे सिध्दार्थ उके या विद्यार्थ्याने दिली.क्षितिज अंध, अपंग व विरंगुळा केंद्र, शास्त्री नगर येथे सोमवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये शिबिर आयोजन संदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. शिबिरात महाराष्ट्रातील जवळपास १२५ अंध विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शिबिराचे उद्घाअन शनिवार २३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता भरतीय ट्रस्टचे चेअरमन दीपक भरतीया यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून शहर वाहतूक विभागप्रमुख विलास पाटिल, क्षितिजचा माजी विद्यार्थी तथा मेणबत्ती व्यवसायिक रामबाबू घुले उपस्थित राहतील. संध्याकाळी ७ वाजता परिचर्चा होणार असून, यामध्ये स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळविलेले, बँकेत नोकरी करीत असलेले तथा व्यवसायात पाय रोवलेल्या अंध युवा सहभागी होणार आहेत. रविवारी २४ डिसेंबर रोजी शस्त्र आत्मविश्वासाचे या विषयावर परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाच्या नवृत्त प्राचार्य अल्का जोग मार्गदर्शन करतील. कवच आहाराचे विषयावर आहारतज्ञ डॉ. वैशाली राठोड मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दंत तपासणी तथा दातांचे संरक्षण कसे करावे ,यावर डॉ. सचिन वानखडे मार्गदर्शन करतील. व्यक्तिमत्व विकास यावर सचिन बुरघाटे व मेधाविनी कुळकर्णी मार्गदर्शन करतील. सायंकाळी शिबिरात सहभागी विद्या र्थ्यांचे कलाविष्कार मनोरंजन कार्यक्रम होईल.सोमवारी २५ डिसेंबर रोजीसंवाद कौशल्य व भाषावृध्दी यावर डॉ.प्रा.स्वाती दामोदरे मार्गदर्शन करतील. तंत्रज्ञानाशी मैत्री यावर मोहिनी मोडक मार्गदर्शन करतील. यानंतर महिलांच्या आरोग्य विषयक स्नेहल चौधरी मार्गदर्शन कर तील. संवाद मित्रांशी याविषयावर डॉ. प्रदीप अवचार मार्गदर्शन करतील, असे उके याने सांगितले. पत्रकार परिषदेला समाजसेविका मंजुश्री कुळकर्णी, सतीश कुळकर्णी,प्रशांत पाखरे, अनिकेत सोळंकी, उमा राठी,गणेश मोहे, दिनेक फुके, नागेश उपरवट,सागर भोपळे, अक्षय शेरोकार उपस्थित होते.
अंधत्वा विषयी गैरसमज दूर करण्यासाठी ‘इंद्रधनु जागृती शिबिर’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 9:19 PM
ग्रामीण भागातील अंध विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रवास, त्यातील तफावत व गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने २३ ते २५ डिसेंबर दरम्यान अकोल्यातील गीतानगरातील भरतीया भवन येथे ‘इंद्रधनु जागृती शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे२३ ते २५ डिसेंबर दरम्यान गीता नगरातील भरतिया भवन येथे आयोजनक्षितिज अंध, अपंग व विरंगुळा केंद्रात पार पडली पत्रारिषद