लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :जिल्ह्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजीपाल्याच्या भावात आलेली तेजी आजतागायत कायम आहे. कांदा, बटाट्यांमध्ये भावाची स्पर्धा होत असून, तूर डाळीने शंभरी ओलांडून दीड शतकाकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे.२४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्यावर घरपोच भाजीपाला ही संकल्पना चांगलीच लोकप्रिय झाली होती; आता कोरोनाचे संकट कायम असतानाही अनलॉकमुळे पुन्हा बाजारातील गर्दी वाढू लागली. सकस आहारावर भर देण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन लक्षात घेता भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. मे आणि जून महिन्यात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे दर स्थिर होते. गेल्या तीन महिन्यांपासून सततचे ढगाळ हवामान आणि वारंवार होणाऱ्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर ४० ते ५० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यातही सप्टेंबरचा शेवट व आॅक्टोबरचा पहिला पंधरवडा भाजीपाल्यासाठी तेजीचा ठरला आहे, तर कोथिंबीरचाही रूबाब दीडशेच्या घरात आहे.व्यापाऱ्यांकडील साठा संपला. शेतकºयांकडे तूर नाही. सरकारने नाफेडद्वारे खरेदी केलेली तूर सध्या बाजारात येत आहे. सरकारनेच किमतीवर नियंत्रण आणले पाहिजे. किमती वाढल्या तर काळाबाजार वाढेल.-वसंत बाछुका, व्यापारी.भाजीपाल्याच्या भावात आलेली तेजी ग्राहकांना भुर्दंड देणारी आहे. पंधरा दिवसांपूर्वीचे भाव आणि आताचे भाव याचे कुठेही तुलनाच होत नाही, कांदे, बटाटे, कोथिंबीर, टमाटे यांच्या भावातील वाढ आश्चर्यकारक आहे.-प्रशांत सोळंके, ग्राहकआयात बंद, नवी तूर येण्यास उशीरडाळींची आयात बंद असून, सध्या नवी तूर बाजारात येण्यास उशीर आहे, त्यामुळे उपलब्ध साठा पाहता भाव वाढले आहेत. सध्या तूर डाळीचे भाव १३५ ते १४५ रुपये प्रति किलो झाले आहेत.