शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

शिक्षण विभागाने मागविली अतिरिक्त शिक्षक, रिक्त पदांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 3:19 PM

अकोला: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांसह रिक्त पदे, आरक्षण, विषय आदी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील शिक्षण संस्थांकडून मागविली आहे.

ठळक मुद्देसप्टेंबर महिन्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची यादी, त्यांच्या हरकती, सुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मराठी शाळा व अल्पसंख्याक शाळांमधील १३0 च्या जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा अंदाज आहे.

अकोला: जिल्ह्यातील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांसह रिक्त पदे, आरक्षण, विषय आदी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील शिक्षण संस्थांकडून मागविली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये अतिरिक्त शिक्षकांची यादी, त्यांच्या हरकती, सुनावणीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्या दृष्टिकोनातून ही माहिती मागविण्यात आली आहे.गतवर्षी जिल्ह्यात ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यापैकी अर्ध्याधिक शिक्षकांचे समायोजनच झाले नव्हते. त्यामुळे अनेक शिक्षकांचे विभागस्तरावर समायोजन करण्यात आले होते. अतिरिक्तचा विषय समोर आला की शाळांमधील शिक्षकांना धडकीच भरते.जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या आॅनलाइन समायोजन करण्यात येते. वेळेपूर्वीच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, विषयनिहाय रिक्त पदे आणि आरक्षणाची माहिती गोळा करण्यासाठी शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. शिक्षण विभागाने २०१७ व १८ च्या संचमान्यतेनुसार खासगी शिक्षण संस्थांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांचे आॅनलाइन समायोजन करण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त शिक्षकांच्या नाव, शाळा, आरक्षणासह यादी तयार करण्यात येणार आहे. ही माहिती गोळा झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित करून त्यांच्याकडून हरकती मागविण्यात येतील. त्यानंतर त्यावर सुनावणी घेण्यात येते. या प्रक्रियेला बराच कालावधी लागत असल्याने आणि अनेक शिक्षण संस्था माहिती देण्यास टाळटाळ करीत असल्याचा अनुभव आहे. तसेच अतिरिक्त शिक्षकांची यादी पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात येत असल्याने, ही प्रक्रिया लांबणीवर पडू नये आणि वेळेपूर्वीच ही माहिती गोळा झाली तर शिक्षकांना न्याय देता येईल. त्यांच्या अडचणी समजून घेता येतील आणि अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया योग्यरीत्या राबविता येईल, हा यामागील उद्देश आहे. यंदासुद्धा मराठी शाळा व अल्पसंख्याक शाळांमधील १३0 च्या जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षक