अकोला: अकोल्याचे उपविभागीय अधिकारी नीलेश अपार यांनी डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील कोविड केअर सेंटर तसेच समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील कोविड केअर सेंटरला रविवारी भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेतली.
...................................................
कोरोना उपाययोजनांचा आज आढावा
अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेणार आहेत. या बैठकीला संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
..........................................................
वाळूची अवैध वाहतूक थांबेना!
अकोला: जिल्ह्यात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पथके गठित करण्यात आली असली तरी, जिल्ह्यात अद्यापही वाळूची अवैध वाहतूक थांबली नाही. त्यामुळे जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक केव्हा थांबणार, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
............................................
पाणीटंचाई आराखड्यावर आज बैठक!
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी शासन निकषानुसार पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तयार करण्याच्या मुद्यावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यावर चर्चा करण्यात येणार आहे.