- राजरत्न सिरसाट
अकोला : शेती विकास व रोजगार निर्मितीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला (आयटी) माहिती तंत्रज्ञान केंद्र मिळणार आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने त्यासाठीची हिरवी झेंडी दाखविली आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अभियंत्यांनी कृषी विद्यापीठाला भेट देऊन माहिती जाणून घेतली आहे. कृषी विद्यापीठाच्यावतीने यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे.माहिती तंत्रज्ञानाचा शेतीला फायदा करू न घेण्यासाठी केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी यासाठीचा पाठपुरावा केला आहे. विद्यापीठाचे कृषी शास्त्रज्ञ संशोधन करीतच आहेत. त्यांना आयटीची जोड दिल्यास या माध्यमातून शेती यंत्र व तंत्रज्ञान विकसित करता येतील, त्याचा शेती विकासाला उपयोग होणार आहे. विशेष करू न गावात रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट असल्याने विद्यार्थ्यांनी गावातच उद्योग उभारावेत, असाही उद्देश आहे. पीक नुकसानाची माहिती यामुळे लवकर मिळण्यास मदत होणार असून, शेतमाल विक्रीसाठी बाजारभाव, देश, परदेशातील बाजारपेठ, शेतमाल निर्यातीची महिती मिळणार असून, ही माहिती तातडीने शेतकऱ्यांना देता येणार आहे. कृषी विद्यापीठ, आयटी व उद्योगजक मिळून विदर्भात गावागावात उद्योग निर्माण करू न विद्यार्थी, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्याला प्राधान्यक्रम दिला जाणार आहे.
आयटी सेंटर मिळाल्यास कृषी संशोधनाला माहिती तंत्रज्ञानाची जोड दिल्यास कृषी विकास साधता येणार आहे. कृषीसाठी लागणारी यंत्र विकसित करता येतील तद्वतच आयटी, कृषी विद्यापीठ व उद्योजक मिळून विदर्भात गावागावात शेतमाल प्रक्रिया उभारू न रोजागार उभारता येणार आहे. केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यासंदर्भात हिरवी झेंडी दाखविल्याने प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंदेकृवि, अकोला.