पातूर तालुक्यात नाफेड हरभरा खरेदी केंद्र केवळ पातूरला असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पातूर येथे हरभरा विक्री करीता आणावा लागत होता. तालुक्यात अनेक खेडे जोडलेले असल्याने या सर्व खेड्याचा भार पातूर येथील एकमेव केंद्रावर येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड हरभरा विक्री करिता कसरत करावी लागत होती. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सहकारमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करुन पातूर तालुक्यातील विवरा येथे जय पुंडलिक माउली अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने नाफेड हरभर खरेदी केंद्राला मान्यता मिळवून दिली. गुरुवारी विवरा येथील जय पुंडलिक माउली अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने नाफेड हरभरा खरेदीला सुरवात करण्यात आली. यावेळी कंपनीचे संचालक श्रीधरराव बोचरे व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हरभरा खरेदीला सुरवात करण्यात आली.
नाफेडमार्फत विवरा येथे हरभरा खरेदीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:17 AM