अकोला : ह्यमाझं शहरह्ण ही संकल्पना अकोलेकरांच्या मनात रूजविण्यासाठी आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला शहरातील स्वयंसेवी संस्थांनी प्रतिसाद दिला. ह्यग्रीन अकोलाह्णसाठी शहरात १ लाख वृक्षलागवडीचा संकल्प स्वयंसेवी संस्थांनी केला. बुधवारी स्थानिक विश्रामगृहात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरिकांनी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत बैठकीत हा निर्धार व्यक्त केला.शहराचा सर्वांगिण विकास करण्याची जबाबदारी एकट्या महापालिका प्रशासनाची नाही. तर त्यामध्ये स्थानिक नागरिकांचा वाटा फार मोलाचा ठरतो. प्रशस्त रस्ते, पार्किंगची व्यवस्था, पदपाथ, खुली मैदाने, लहान मुलांच्या मनोरंजनासाठी बगिचे व स्वच्छता आदि बाबींसाठी नागरिक आग्रही असतात. शहर आपलं आहे, या भावनेतून नागरिकांनी मनपाला सहकार्य करण्याचे भावनिक आवाहन यापूर्वी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले होते. शिवाय ह्यग्रीन अकोला, क्लिन अकोलाह्ण संकल्पना राबवण्यासाठी स्वयंसेवी संस्था व अकोलेकरांना मदतीचे आवाहन करताच अनेक संस्था व प्रतिष्ठीत नागरिक सरसावले आहेत. रेड क्रॉस सोसायटीचे प्रभजितसिंह बछेर, प्रभात किडसचे संचालक गजानन नारे, आपला प्रयास संस्थेच्या निता अग्रवाल, डॉ.विवेक हिवरे,विजय तोष्णीवाल, डॉ.सुनिल जवळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुंदरदास भगत,मधू जाधव आदिंसह असंख्य समाजसेवींनी बुधवारी आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत स्थानिक विश्राम गृह येथे चर्चा केली. यावेळी ह्यग्रीन अकोलाह्णसाठी १ लाख वृक्ष लागवड करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वृक्षलागवडीसाठी ह्यट्री गार्डह्णची व्यवस्था करण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शवली. यावेळी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व कर्मचारी उपस्थित होते.
‘ग्रीन अकोला’साठी स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
By admin | Published: July 03, 2014 1:28 AM