सचिन राऊत । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर अवैधरीत्या सुरू असलेल्या ‘हुक्का पार्लर’वर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने कारवाई केल्यानंतर, या प्रकरणाची चौकशी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन या दोन यंत्रणेकडून करण्यात येणार आहे. हुक्का पार्लरमधून १0 मुख्याध्यापक, शिक्षक, १0 विद्यार्थी व ढाबा मालकास अटक करण्यात आली होती.पातूर रोडवरील नावाजलेल्या अमनदीप ढाब्यावर मोठय़ा प्रमाणात अवैधधंदे चालत असून, बेकायदेशीररीत्या ‘हुक्का पार्लर’ चालविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह शनिवारी मध्यरात्री गंगानगर येथील रहिवासी मोहम्मद मुख् तबीर शेख बशीर याच्या मालकीच्या अमनदीप ढाब्यावर छा पेमारी केली. या छापेमारीत शिक्षक महेश सीताराम मानकरी (३९), दिनेश आत्माराम केकन (४0), संतोष तेजसिंह राठोड (४३), विजय पांडुरंग भुतकर (३८), सुनील ज्ञानदेव गवळी (३६), गोपीकृष्ण राजाराम येनकर (५१), सुखदेव रामजी शिंदे (४0), अनिल नामदेव दाते (४४), संजय देवराव इंगळे (४३), धीरज नंदू यादव (३२), या १0 मुख्याध्यापक, शिक्षकांसह १0 विद्यार्थी व ढाबा मालकास अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून १ लाख १0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत पातूर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक असून, सिंधी कॅम्पमधील १0 विद्यार्थी सहभागी आहेत. यामधील विद्या र्थ्यांची चौकशी अन्न व औषध विभाग करणार असून, मु ख्याध्यापक- शिक्षकांची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.
शिक्षक पतसंस्थेचा संचालकही आरोपीविशेष पथकाने केलेल्या कारवाईत अकोला जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालक संजय देवराव इंगळे यालाही हुक्का पार्लरमधून ताब्यात घेण्यात आले.
शिक्षकांना बडतर्फ करा! विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्याचे कार्य करणार्या शिक्षक व मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांना सोबत घेऊनच हुक्का पार्टी कर ताना रंगेहात अटक केल्यानंतर, या १0 शिक्षक, मुख्याध्या पकांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी होत आहे. या शिक्षकांनी शिक्षकी पेशाला काळिमा फासण्याचा प्रताप केला असून, राज्यभरातील शिक्षकांच्या प्रतिमेला मोठा डाग लावला आहे. त्यामुळे या शिक्षक व मुख्याध्यापकांवर ता तडीने बडतर्फची कारवाई करण्याची मागणी होत आहे.
विशेष पथकाची जिल्हाभर चर्चाजिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वाधीक कारवाया केल्या. त्यामुळे अनेक पोलीस अधिकार्यांची गोची होत असल्याने या पथकाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. या पथकाला भ्रमणध्वनीवर माहिती देताच तातडीने कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांचाही विश्वास संपादन झाला आहे. पोलीस अधीक्षक कलासागर पथकाच्या पाठीशी ठामपणे असल्याने विशेष पथकाला एक वेगळी ओळख मिळाली आहे.