कृषी संजीवनी योजनेतून अर्थसाहाय्य
बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत बाळापूर तालुक्यातील ५७ गावांचा समावेश करण्यात आला. तीन टप्प्यात योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गंत शेतकऱ्यांना ठिंबक सिंचन, तुषार सिंचन, शेटनेट हाऊस, पॉली हाऊस, फळबाग लागवड, ट्रॅक्टर, शेती अवजारे, शेततळे देण्यात येतात. तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी देवेंद्र करणकार यांना सरपंच संजय अघडते यांच्या हस्ते ट्रॅक्टर व पेरणी यंत्राचे वितरण करण्यात आले.
सिरसोली येथे शहिद दिन साजरा
सिरसोली: सिरसोली ग्रामपंचायत कार्यालयात शहिद दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला सरपंच सारिका वानरे, उपसरपंच उषा नागमते, संजय खोटरे, चेतन गुहे, नंदकिशोर गेबड, रमेश मुयांडे, मोहन कोल्हे, दीपक मालठाणकर, संदीप अंबुसकर, प्रवीण वानरे, दीपक वानखडे, नागसेन भारसाकळे, शंकर अनासाने, विकास वानखडे आदी उपस्थित होते.
मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
बाळापूर: कोळासा येथील एका १६ वर्षीय मुलीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. वैष्णवी राजेश वानखडे असे मृतक मुलीचे नाव आहे. तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. धम्मदीप वानखडे यांच्या तक्रारीनुसार बाळापूर आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पातूर नंदापूर येथे वरली जुगारावर छापा
पातूर नंदापूर: येथील सायंकाळी सुरू असलेल्या वरली जुगार अड्ड्यावर विशेष पथकाने छापा घालून सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून रोख १० हजार, २० हजार रूपये किंमतीचे मोबाइल जप्त केले. पोलिसांनी अफसर खा गुलशेर खा, सीताराम काटोले, सुनील श्यामराव मनवर, वसीम अफसर, राजु खान पठाणण, राहुल भगत यांच्याविरूद्ध जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
कानडी परिसरात अवकाळी पावसाने नुकसान
मूर्तिजापूर: तालुक्यातील कानडी बाजार परिसरात सतत तीन-चार दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभरा, कांदा व आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. पीक नुकसानाचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. लॉकडाऊन व कोरोनामुळे शेतकरी आधीच हवालदील झाला आहे. त्यात अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. शासनाने शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.