अकोला, दि. ३१: यवतमाळ जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून आलेल्या गुणवत्ता अभिवाचन चमूकडून बुधवारी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे निरीक्षण करण्यात आले. रुग्णालयांमधील सोयी-सुविधांविषयी दरवर्षी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेदरम्यान रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणार्या रुग्णालयांचे निरीक्षण करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ येथील गुणवत्ता अभिवाचन चमूनेजिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली. पाहणीदरम्यान गुणवत्ता अभिवाचन चमूतील सदस्यांनी रुग्णालयात वर्षभरामध्ये किती महिलांच्या प्रसूती झाल्या, किती मुला-मुलींचा जन्म झाला, यासोबतच किती खाटा उपलब्ध आहेत, दररोज किती महिला रुग्ण रुग्णालयात भरती होतात, कोणकोणत्या सोयी उपलब्ध आहेत, इमारत कशी आहे, खाटा व्यवस्थित आहेत की नाही, महिला रुग्णांना कोणत्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात, भोजनाचा दर्जा कसा आहे, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिका, डॉक्टरांचे संख्याबळ पुरेशे आहे किंवा नाही, आदींबाबत निरीक्षण केले. यावेळी चमूसोबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. तरंगतुषार वारे यांच्यासह अधिकारी, परिचारिका, कर्मचारी वैद्यकीय उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये सर्वाधिक गुण मिळविणार्या रुग्णालयाला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते, अशी माहिती डॉ. वारे यांनी दिली
गुणवत्ता अभिवाचन चमूकडून स्त्री रुग्णालयाचे निरीक्षण
By admin | Published: September 01, 2016 2:42 AM