राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या वाडेगाव परिसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोजक्या शेतकऱ्यांनी उडीद पीक घेतले आहे. परंतु सततच्या पावसामुळे पिकावर लष्करी अळीने हल्ला केला असल्याचे वृत्त लोकमतने २५ ऑगस्ट रोजी प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी अरुण मुंदडा यांनी शेतात भेट देऊन पिकाची पाहणी केली.
या परिसरात बऱ्याच शेतकऱ्यांनी मूग, उडीद, पिके घेतली असून या पिके फुलावर आले आहेत. तसेच या फुलावर आलेल्या पिकांवर लष्करी अळीने शेंगा व फुले फस्त केले होते. येथील शेतकरी दीपक घाटोळ यांनी साडेतीन एकरामध्ये उडीद पीक घेतले होते. अगोदरच शेतकरी संकटात सापडलेला असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अनंता काळे यांनी माहिती दिली होती. त्यांच्या सांगण्यावरून मंगेश वाघमारे, सचिन वसंता काळे, दीपक घाटोळ आदींच्या शेतात पाहणी करून पीक विमा काढला असेल तर त्याचा विमा मिळू शकतो. शेतकऱ्यांच्या उडीद पिकाला शेंगा नसल्यामुळे उत्पन्न काहीच होणार नसल्याचे शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांना सांगितले आहे. तसेच शासनाने या शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून द्यावी, अशी मागणी केली.
फोटो: