शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

अकोला ‘जीएमसी’मधील आंतरवासीता डॉक्टर संपावर

By atul.jaiswal | Published: June 13, 2018 5:00 PM

असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी)या संघटनेने पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) सहभागी झाले आहेत.

ठळक मुद्देप्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून काम थांबवले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत.नाईलाजाने संपूर्णं महाराष्ट्रतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना संपावर जावे लागत असल्याचे ‘अस्मी’चे जिÞल्हा प्रतिनिधि डॉ.अंकित तायडे यांनी सांगितले.

अकोला : राज्यातिल सर्व वैद्यकीय व दंत महाविद्यालयातिल आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) विद्यावेतनात वाढ करण्याच्या मागणीसाठी बुधवार, १३ जूनपासून बेमुदत संपावर गेले आहेत. असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी)या संघटनेने पुकारलेल्या अनिश्चितकालीन संपामध्ये येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील प्आंतरवासिता डॉक्टर (इंटर्न) सहभागी झाले आहेत. मात्र, या संपामुळे रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना सध्या सहा हजार रुपये विद्यावेतन मिळते. मात्र प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या २०१५ साली घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची आहे. या डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून काम थांबवले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत संप करण्यावर ते ठाम आहेत.सध्या उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार ९०० , कर्नाटकमध्ये १९ हजार ९७५, पश्चिम बंगालमध्ये २१हजार, बिहारमध्ये १५ हजार, छत्तीसगढ, ओरिसा, आसाम आणि केरळमध्ये दरमहा २० हजार रुपये इतके विद्यावेतन दिले जाते. या संदर्भात नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते. एप्रिल २०१८ रोजी याच विषयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी निदर्शने सुद्धा केली होती. २ मे २०१८ ला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स (अस्मी)च्या प्रतिनिधींना येत्या १५ दिवसात या विषयावर निकाल लावण्याचे आश्वासन देण्यात आले .तरी मागील ३०-४० दिवसांपासून यावर निर्णय देण्यात आलेला नाही. त्यामुळे नाईलाजाने संपूर्णं महाराष्ट्रतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना संपावर जावे लागत असल्याचे ‘अस्मी’चे जिÞल्हा प्रतिनिधि डॉ.अंकित तायडे यांनी सांगितले.रुग्णसेवा ४८ तास; मानधन २०० रुपये प्रतीदिवसअकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर विद्यार्थी व निवासी डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही. अशा ठिकानी अंतरवासितांना सलग ३६-४८ तास रूग्णसेवा करावी लागते; परंतु शासनाच्या दिरंगाई मूळे १५/०७/२०१५ रोजी आंतरवासितांचे वेतनमान रु.११००० करण्याबाबत निर्णय होउनही अद्यापही आंतरवासीतांना त्यांच्या या सलग रुग्णसेवेचा मोबादला म्हनून मात्र रु.२०० प्रतिदिवस याप्रमाने मानधन देन्यात येत असल्याचे डॉ. अंकित तायडे यांनी सांगितले.या आहेत मागण्या१) तातडीने सर्व आंतरवासीता डॉक्टरांचे वेतनमानवाढ करणे.२) वाढीव वेतनमान फेब्रुवारी २०१८ पासुन लागू करणे.३) आमच्या कामाचे तास निश्चित करणे.४) आंतरवासिता डॉक्टर्स च्या संपा मुळे आमच्या आंतरवासितेची मुदत वाढवु नये.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय