महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊनच देश जोडण्यास निघालोय - राहुल गांधी

By सुनील काकडे | Published: November 17, 2022 09:56 AM2022-11-17T09:56:51+5:302022-11-17T09:58:11+5:30

Bharat Jodo Yatra: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यासह इतर महापुरुषांनी समाजाला शांती, स्नेह आणि बंधुत्वाची शिकवण दिली.

Inspired by the thoughts of great men, we are going to unite the country - Rahul Gandhi | महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊनच देश जोडण्यास निघालोय - राहुल गांधी

महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊनच देश जोडण्यास निघालोय - राहुल गांधी

Next

- सुनील काकडे/अनिस बागवान 
मेडशी (जि. वाशिम) : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यासह इतर महापुरुषांनी समाजाला शांती, स्नेह आणि बंधुत्वाची शिकवण दिली. त्याच विचारांनी प्रेरित होऊन भारत जोडो यात्रेची यशाकडे वाटचाल सुरू आहे. वाटेत भेटणाऱ्या लाखो लोकांचे प्रेम चालण्याचे बळ देत आहे, असे काँग्रेसचे नेते खासदार राहुल 
गांधी म्हणाले.  
मेडशी (ता. मालेगाव) येथे बुधवारी सायंकाळी झालेल्या कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर विविध मुद्दे उपस्थित करत त्यांनी  कडाडून हल्लाबोल केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हरयाणातील खासदार दीपेंद्रसिंग हुड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, आमदार अमित झनक आदी मान्यवर उपस्थित हाेते. aकाही राजकीय पक्षाचे नेते येतात आणि मन की बात करतात पण मी तुमची मन की बात ऐकण्यास आलो आहे. कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडविणाऱ्या अरबपतींना ‘नाॅन परफाॅर्मिंग असेट्स’ संबोधून सोडून दिले जात आहे, तर शेतकऱ्याला ‘डिफाॅल्टर’ संबोधून त्याची अवहेलना केली जात आहे, असे राहुल म्हणाले.

Web Title: Inspired by the thoughts of great men, we are going to unite the country - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.