अकोला: प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये रिक्त असलेल्या २0 हजार पदांसाठी शिक्षक भरती घेण्याची शासनस्तरावर प्रक्रिया सुरू आहेत. निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी शिक्षक भरती पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागाने ८ व ९ फेब्रुवारी रोजी शिक्षण संस्थांना पवित्र पोर्टलवर बिंदुनामावली (रोस्टर) भरण्याचे निर्देश दिले असल्याचे शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिले सांगितले.गत काही दिवसांपासून शिक्षक भरतीची शिक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे. शिक्षक भरती घेण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या असून, पवित्र पोर्टलवर शिक्षण संस्थांची बिंदुनामावली, रिक्त पदे, जातीचा संवर्ग अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८२ शिक्षण संस्थांची बिंदुनामावली शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाकडे आली होती. या संस्थांची बिंदुनामावली शिक्षणाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्गीय कक्षाकडे तपासणीसाठी पाठविली होती. मागासवर्गीय कक्षा ही बिंदुनामावली तपासून शिक्षण संस्थांकडे पाठविली आहे; परंतु अद्यापही जिल्ह्यात अनेक शिक्षण संस्थांनी बिंदुनामावली शिक्षण विभागाकडे सादर केली. ८ व ९ फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये शिक्षण संस्थांनी बिंदुनामावली पवित्र पोर्टलवर अद्ययावत करावी. अन्यथा शिक्षक भरती शिक्षण संस्था बाद झाल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असा इशाराही शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे. पवित्र पोर्टलवर शिक्षण संस्थांमधील बिंदुनामावलीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षण संस्थांना शिक्षक भरतीच्या जाहिरातीची परवानगी शिक्षण विभागाकडून देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शिक्षक भरतीची जाहिरात निघण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिक्षण विभाग व संस्थाचालकांकडून अभियोग्यता चाचणी, बिंदू व विषयानुसार शिक्षकांची मुलाखत घेतील, अशी माहितीही शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (प्रतिनिधी)बिंदुनामावलीसाठी दोन दिवस८ व ९ फेब्रुवारीशिक्षण संस्थांचे तपासले रोस्टर८२जिल्ह्यात रिक्त जागा८९