अकोला : शहरातून दैनंदिन ओला कचरा, हॉटेलमधील शिळे अन्न यापासून बायोगॅसची निर्मिती शक्य आहे. तसा प्रस्ताव घनकचºयाच्या ‘डीपीआर’मध्ये समावेश करा आणि सात दिवसांनंतर ‘डीपीआर’ सादर करण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी मनपा प्रशासनाला दिले.शहरातून निघणाºया दैनंदिन कचºयावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी राज्य शासनाने प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. यादरम्यान शासन स्तरावरून अमरावती विभागातील दोन महापालिका व नगर परिषदांसाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी शासनाने ‘मार्स प्लॅनिंग अॅण्ड इंजिनिअरिंग सर्व्हिस प्रा. लिमिटेड अहमदाबाद’ या संस्थेची नियुक्ती केली. ‘मार्स’ने प्रकल्प अहवाल तयार केल्यानंतर प्राथमिक स्तरावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने तांत्रिक मंजुरी दिली आहे. या डीपीआरला राज्य शासनाच्या तांत्रिक समितीच्या मंजुरीची आवश्यकता असल्यामुळे गुरुवारी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या दालनात बैठक ीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ उपस्थित होते.