स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान; भाजपने जाळला काँग्रेसच्या खर्गे यांचा पुतळा
By आशीष गावंडे | Published: December 8, 2023 06:43 PM2023-12-08T18:43:09+5:302023-12-08T18:43:34+5:30
काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले.
अकोला : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी अवमान केल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीने प्रियांक खर्गे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. स्थानिक खुले नाट्यगृहासमोर शुक्रवारी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
काँग्रेसच्या कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. त्याचे पडसाद शुक्रवारी अकोला शहरात उमटले. देशभक्तांचा अपमान करण्याची काँग्रेसची परंपरा असून अशा प्रवृत्तींचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी स्पष्ट केले. स्थानिक खुले नाट्यगृह चौकात प्रियांक खर्गे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात भाजपचे महानगराध्यक्ष जयंत मसने, माजी महापौर विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, कृष्णा शर्मा, गिरीश जोशी, निलेश निनोरे, चंदा शर्मा, पवन महल्ले, दिलीप मिश्रा,कैलास रणपिसे, सतीश ढगे, संदीप गावंडे, संजय गावंडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.