कार्यक्रमाचे अध्यक्ष मधापुरीचे सरपंच प्रदीप ठाकरे होते. यावेळी जलदूत रवींद्र इंगोले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी लखपती होण्यासाठी मधापुरी येथे रेशीम उद्योगांतर्गत तुती लागवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, तुती लागवडीचे महत्त्व सांगण्यासाठी ‘सिल्क-टू-मिल्क’ असा उपक्रम राबविला जात असून, हा उपक्रम मधापुरी येथे राबविला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, असे सांगितले. पुढे ते म्हणाले, सेंद्रिय शेती करणे नितांत गरजेचे आहे, तसेच त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच प्रदीप ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन करून अमर ठाकरे यांनी आभार मानले.
याप्रसंगी रोजगार सेवक रवींद्र मोहिते, ग्रामसेवक रवींद्र राठोड, नंदकिशोर सिरस्कर, मिलिंद ठाकरे, अमर ठाकरे, दीपाली सोळंके, माधुरी इंगळे, संजय नाईक, अजाब मोहिते यांची उपस्थिती होती. (फोटो)