अकोला : विधानसभेच्या जागा वाटपावरून कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही पक्षांचे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले आहेत. निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यानंतरही जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने पदाधिकारी आणि कार्यक र्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या अकोला पूर्व, अकोला पश्चिम, आकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांसाठी कॉँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. जिल्हा कॉँग्रेस कमिटीने पाचही म तदारसंघांसाठीचे अर्ज प्रदेश कार्यालयात पाठविले होते. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी अकोला पूर्व व पश्चिम, आकोट आणि बाळापूर या चार विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या सामूहिक मुलाखती प्रदेश कार्यालयात घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या नाहीत. कॉँग्रेसने सुरुवातीला २८८ पैकी १७४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने १४४ जागांची मागणी केली; मात्र कॉँग्रेसने ही मागणी फेटाळली. त्यामुळे दबावतंत्राचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. यामध्ये जिल्ह्यातील आकोट- ७, बाळापूर -५, अकोला पूर्व -४, अकोला पश्चिम -६ व मूर्तिजा पूरसाठी १७ अर्जांचा समावेश होता. त्यानुसार मुंबई येथे इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. परिणामस्वरूप कॉँग्रेसने उर्वरित ११४ जागांसाठी इच्छुकांशी चर्चा केली. यामध्ये अकोला जिल्ह्या तील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचा समावेश होता. दरम्यान, कॉँग्रेसने १७४ जागांच्या यादीला अंतिम स्वरूप दिल्याची माहिती शनिवारी समोर आल्यानं तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने कॉँग्रेसला जागांचा तिढा लवकर सोडविण्याचा अल्टिमेटम दिला. त्यामुळे कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार धास्तावले.
अकोला जिल्ह्यातील इच्छुक ‘ऑक्सिजन’वर !
By admin | Published: September 21, 2014 1:35 AM