अकोला : फार्र्मस डायलॉग इंटरनॅशनल, या शेतकर्यांसाठी जागतिक स्तरावर काम करणार्या संस्थेने १४ वा आंतरराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद भारतात आयोजित केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला या आयोजनाचा बहुमान मिळाला असून, ४ ते ७ डिसेंबर दरम्यान हा परिसंवाद येथे होणार आहे. कृषी विद्यापीठासह डॉ. पंजाबराव देशमुख अँग्रिकल्चरल फाऊंडेशन आणि मुंबई येथील नैराबजी रतन टाटा ट्रस्ट यांचा या आयोजनामध्ये सहभाग आहे. आंतराष्ट्रीय महिला सबलीकरण वर्षाचे औचित्य साधून ह्यशेतकरी महिलांचे सबलीकरण आणि उत्पन्नवाढीचे तंत्रज्ञानह्ण या विषयावरील आंतराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयी होणार आहे. जागतिक हवामान बदल, खुली अर्थव्यवस्था व निसर्गचक्रातील विरोधाभास सहन करीत, देशाला कृषिप्रधानतेचा दर्जा देणार्या शेतकरी वर्गाला कृषिक्षेत्रातील आंतरराष्ट्रीय घडामोडी, तंत्रज्ञान अगदी सहजतेने समजून घेण्यासाठी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी या आंतराष्ट्रीय परिसंवादासाठी पुढाकार घेतला आहे. या परिसंवादामध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रांस, युनायटेड किंगडम, टांझानिया, केनिया, युगांडा, उझबेकीस्तान,अमेरिका, इस्त्राईल, कॅनडा, दक्षिण कोरिया आदी देशांमधून जवळपास ३0 शेतकर्यांसमवेत एकूण ५५ भारतीय शेतकरी सहभागी होणार आहेत. गुरुवारी सकाळी १0 वाजता कृषी महाविद्यालयाच्या डॉ. के.आर. ठाकरे सभागृहात परिसंवादाचे उद्घाटन होईल. एकूण सात सत्रांमध्ये विविध कृषितट्ठज, शेतकरी तसेच शेतकरी मार्गदर्शन करणार आहेत. यासह कृषी विद्यापीठाचे प्रक्षेत्र आणि प्रगतिशील शेतकर्यांच्या शेतावर भेटी दिल्या जाणार आहेत. या परिसंवादात राज्यातून येणार्या शेतकर्यांसाठी खुले चर्चासत्र ७ डिसेंबर रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत याच सभागृहात पार पडणार आहे.
अकोल्याच्या कृषी विद्यापीठात उद्यापासून आंतराष्ट्रीय शेतकरी परिसंवाद
By admin | Published: December 03, 2014 12:28 AM