अकोला : वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, मंगळवारी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. मंगळवारी अकोल्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी वंचित बहुजन आघाडी पार्लमेंटरी बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर सुलताने व दीपक गवई यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या १२३ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.विधानसभा मतदारसंघनिहाय मुलाखती देणारे असे आहेत उमेदवार!मतदारसंघ उमेदवारअकोला पूर्व २६मूर्तिजापूर ४०बाळापूर ३०अकोट २२अकोला पश्चिम ०५..........................................एकूण १२३