अकोला, दि. २६- जिल्ह्यातील पाच पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने ७३२ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. भाजपच्या पक्ष कार्यालयात बुधवारी मुलाखत प्रक्रिया पार पडली. संभाव्य उमेदवारांची यादी भाजप प्रदेशकडे पाठविण्यात आली असून, इच्छुक उमेदवारांचे यादीकडे लक्ष लागले आहे. अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर व मूर्तिजापूर अशा पाच नगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पार पडल्या. भाजपच्यावतीने निवडणूक लढविण्यासाठी तब्बल ७३२ उमेदवारांनी मुलाखतीला हजेरी लावली. पक्ष कार्यालयात बुधवारी सकाळी १0 वाजता बाळापूर व मूर्तिजापूर येथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कोअर कमिटीचे सदस्य खासदार संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठीकर, प्रदेश सरचिटणीस रामदास आंबटकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शीला खेडकर, रामदास तायडे, रवी गावंडे, बाबुराव शेळके व श्रीकृष्ण मोरखडे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. उमेदवारांच्या गर्दीमुळे रात्री उशिरापर्यंत मुलाखत प्रक्रिया सुरू होती.
मुलाखती आटोपल्या; प्रतीक्षा उमेदवारीची
By admin | Published: October 27, 2016 3:34 AM