अकाेला : दिवाळी तसेच विविध धार्मिक सन उत्सवाच्या काळात शहरात तसेच जिल्हयात काेणतीही अनूचीत घटना घडणार नाही याची दक्षता घेण्यासाठी दहशतवाद विराेधी कक्षाचे प्रमूख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात शनिवारी शहराच्या विविध भागात तपासणी करण्यात आली. शहरातील महत्वाची व गर्दीचे ठिकाण असलेले मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशनसह शहरातील विविध राेडवर तसेच कार्यालयात बाॅम्ब शाेधक व नाशक पथकाला साेबत घेउन तपासणी करण्यात आली. यावेळी श्वानपथकाव्दारे प्रवाश्यांच्या बॅग तपासणी करण्यात आली. मध्यवती बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशनवर पाहीजे त्या प्रमाणात गदीर् नव्हती मात्र तरीही दहशतवाद विराेधी कक्षाव्दारे ही तपासणी करण्यात आली. िदवाळी सनाच्या पृष्ठभुमीवर ही तपासणी करण्यात आल्याची माहिती दहशतवाद विराेधी कक्षाचे प्रमूख विलास पाटील यांनी दिली.
शहरात अनुचीत घटना घडू नये यासाठी आधीच खबरदारी म्हणूण पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या िनदेर्शावरुन बसस्थानक व रेल्वे स्टेशन परिसरात तपासणी करण्यात आली. या तपासणी माेहिम सुरुच राहणार आहे. कुणालाही गैरप्रकार िदसल्यास त्यांनी संपकर् साधावा
- विलास पाटील, प्रमूख दहशत वाद विराेधी कक्ष