अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या कृषी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परीक्षेत २५00पैकी केवळ २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रक्रियेत घोळाची चौकशी करण्याचे आश्वासन कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी दिले. राष्ट्रीय युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विमल जैन यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने कृषिमंत्री एकनाथ खडसे यांची शुक्रवारी भेट घेतली. निकालातील घोळाची माहिती कृषिमंत्र्यांना देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांच्या उत्तरप्रत्रिका पुन्हा तपासण्यात याव्यात, चार विषयांमध्ये वाढीव दहा गुण देण्यात यावे, कृषी विद्यापीठांद्वारे मान्यताप्राप्त ४६ महाविद्यालयांपैकी १७ महाविद्यालयांनी शून्य टक्के निकाल दिला, त्या सर्वांची मान्यता रद्द करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
कृषी तंत्रनिकेतनच्या परीक्षेतील घोळाची होणार चौकशी
By admin | Published: August 10, 2015 1:00 AM