गत आठवड्यात मान्सूनने पुन्हा लहरीपणाचा अनुभव दिला. कमी दाबाचे क्षेत्र गुजरात किनारपट्टी जवळ स्थिर असल्याने, राज्यात सर्वत्र स्थानिक स्वरुपात तुरळक पावसाची उपस्थिती राहिली आहे. सर्व जिल्ह्यात तापमान वाढलेले आणि वातावरण दमट होते. मान्सूनचा जास्त पाऊस अरबी समुद्रावर बरसत राहिला. उपग्रह छायाचित्रानुसार मान्सून मध्य प्रदेश सीमेलगतच्या पुन्हा सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी विदर्भात तुरळक ते मध्यम स्वरुपात पावसाला झाला.
अमरावती विभागातील सरासरीपेक्षा जास्त पाऊस
सर्वच जिल्ह्याच कमीअधिक प्रमाणात पाऊस होत आहे. अमरावती विभागात सरासरी २८६.७ मिमी पाऊस झाला. तर आतापर्यंत ३३२.२ मिमी म्हणजेच ११५.९ टक्के पाऊस झाला आहे. विभागातील सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
राज्यात तापमान २७-३४ डिग्री सेल्सिअसदरम्यान, तर आर्द्रता ५०-८० टक्क्यांपर्यंत आहे. येणाऱ्या आठवड्यात अनियमित पाऊस बरसण्याचे अनुमान आहे.
- संजय अप्तूरकर, हवामान अभ्यासक