शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
5
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
6
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
7
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
8
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
9
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
10
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
11
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
12
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
13
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
14
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
15
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
16
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
17
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
18
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
19
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारात अनियमितता; सहा खासगी रुग्णालयांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:19 AM

अकोला: शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, कोराेनाबाधित रुग्णांवर उपचार करताना अनियमितता करणाऱ्या अकोला शहरातील सहा खासगी रुग्णालयांच्या चालकांना ...

अकोला: शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, कोराेनाबाधित रुग्णांवर उपचार करताना अनियमितता करणाऱ्या अकोला शहरातील सहा खासगी रुग्णालयांच्या चालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवार, १९ एप्रिल रोजी दिला. खासगी रुग्णालयांच्या चौकशीसाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने चौकशी अहवाल सादर केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

खासगी रुग्णालयांची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गठित केलेल्या समितीने अकोला शहरातील खासगी रुग्णालयांची पाहणी करून चौकशी केली. चौकशीनंतर समितीमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करता, कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांवर उपचार करताना अनियमितता आढळून आल्याने, अकोला शहरातील रामदासपेठमधील सिटी हॉस्पिटल, बस स्थानकजवळील आधार हॉस्पिटल, हार्मोनी हॉस्पिटल, रतनलाल प्लाॅटमधील श्री गणेश हॉस्पिटल, जयहिंद चौकमधील डॉ. भिसे यांचा दवाखाना व बिहाडे हॉस्पिटल इत्यादी सहा खासगी रुग्णालयांच्या चालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला.

रुग्णालयांमध्ये अशा आढळून आल्या अनियमितता!

शहरातील संंबंधित सहा खासगी रुग्णालयांमध्ये आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट उशिराने झाल्या, काही अहवाल प्रलंबित असणे, चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तसेच अहवाल जिल्हा प्रशासनास न कळविणे, कोविड चाचणी निगेटिव्ह व एचआरसीटी स्कोअर जादा असतांना रुग्णांना शासनाच्या रुग्णालयात व कोविड रुग्णालयात संदर्भित करण्याऐवजी नातेवाइकांच्या संमतीशिवाय रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर करणे, शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सूचनांप्रमाणे डीसीएच किंवा डीसीएचसीला तत्काळ संदर्भित न करणे इत्यादी अनियमितता आढळून आल्याचा अहवाल चौकशी समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

जादा आकारलेली रक्कम

रुग्णास परत करण्याचा आदेश !

शहरातील बिहाडे हॉस्पिटल येथे एका रुग्णास जादा शुल्क आकारणी केल्याचे चौकशीत आढळले आहे.त्यामुळे जादा आकारलेली रक्कम संबंधित रुग्णास परत करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बिहाडे हाॅस्पिटलला दिला आहे. तसेच याबाबतची अनियमितता आढळून आल्यास रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.