अकोला: तेल्हारा तालुक्यातील सर्वात मोठ्या हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये निधीचा प्रचंड अपहार झाल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. याप्रकरणी प्राप्त प्राथमिक चौकशी अहवालातील तांत्रिक बाबी व जोडपत्र एक ते चारसाठी फेरचौकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सोमवारी दिला. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ४ कोटी ४० लाख रुपये खर्चाच्या १२१ कामांना प्रशासकीय मंजुरीही देण्यात आली.ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार झाल्याची तक्रार सदस्यांनी केली होती. त्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र फडके यांनी प्राथमिक चौकशी केली. त्या चौकशी अहवालातील तांत्रिक बाबींची पडताळणी तसेच जबाबदारी निश्चित करून १ ते ४ दोषारोपपत्र बजावण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर ढवळे यांनी फेरचौकशी करण्याचा आदेश त्यांनी दिला. सोबतच बाळापूर पंचायत समितीमध्ये संगणक आॅपरेटरला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना सुरक्षा देण्याचेही निर्देश बैठकीत देण्यात आले. घरकुलाशी संबंधित नोंदी ठेवणाºया पंचायत समितीमधील आॅपरेटर्सना मारहाणीची घटना घडल्याने त्याची गंभीर दखल घेण्यात आली. यावेळी विविध विभागाचा आढावा घेण्यात आला.
हिवरखेड ग्रा.पं.मध्ये निधी अपहाराची फेरचौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:58 AM