अकोला : राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अकोला तालुक्यातील शिवापूर येथील शेतकºयांचे सिंचन विहीर आणि फळबाग लागवडीचे अनुदान गत दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या मुद्यावर गुरुवारी आमदार रणधीर सावरकर यांनी संताप व्यक्त करीत, रोहयो उपजिल्हाधिकाºयांना विचारणा केली.सिंचन विहिरींची कामे पूर्ण केल्यानंतर आणि फळबाग लागवड केल्यानंतर अनुदानाच्या रकमेसाठी शेतकºयांना दोन वर्षांपासून चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (रोहयो) अशोक अमानकर यांना विचारणा करीत संताप व्यक्त केला. शेतकºयांच्या प्रलंबित अनुदानासंदर्भात रोहयो आयुक्त आणि शासनाच्या रोहयो विभागाकडे वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा करण्यात आल्याचे उपजिल्हाधिकारी अमानकर यांनी यावेळी सांगितले.शेतकरी आत्महत्यांमध्ये अधिकाºयांची असंवेदनशीलता कारणीभूत!संकटात सापडलेल्या शेतकºयांना आत्महत्या होत आहेत. त्यामध्ये अधिकाºयांची असंवेदनशीलता कारणीभूत आहे, असा आरोप करीत शासनाला बदनाम करणाºया संबंधित अधिकाºयांना धडा शिकविला पाहिजे, असेही आ. सावरकर यांनी सांगितले.