शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
4
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
5
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
7
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
8
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
9
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
10
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
12
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
13
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
14
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
15
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
16
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
17
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
19
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
20
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..

अधिकारी-शिक्षकांवर कारवाईचा मुद्दा गाजणार!

By admin | Published: July 05, 2017 1:38 AM

समितीपुढे आज साक्ष : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुंबईत ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेत जातवैधता न घेताच राखीव जागांवर शिक्षकांना नियुक्त्या देण्यात आल्या. त्या शिक्षकांसह संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषदेने काय कारवाई केली, याबाबत दोनदा पुढे ढकललेली साक्ष उद्या बुधवारी अनुसूचित जमाती कल्याण समितीपुढे होत आहे. विशेष म्हणजे, अनेक प्रकरणांतील संपूर्ण कागदपत्रे घेऊन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांना एक दिवस आधीच बोलावून घेण्यात आले आहे. त्यामध्ये सुनंदा गेडाम यांच्यावर मानीव दिनांकाबाबत झालेल्या प्रकरणाचाही समावेश आहे.अनुसूचित जमाती कल्याण समितीने २०१०-११ मध्ये अकोला जिल्हा परिषदेला भेट दिली. त्याचा दुसरा अहवाल २४ जुलै २०१० रोजी सभागृहात सादर केला. त्या अहवालामध्ये जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अनुसूचित जमातीचे अधिकारी-कर्मचारी यांची भरती, पदोन्नती, आरक्षण, अनुशेषासह विविध कल्याणकारी योजनांची संपूर्ण माहिती सादर करण्यात आली. अकोला जिल्हा परिषदेत मुख्यत्वेकरून गाजलेला शिक्षक भरती घोटाळ्याची गंभीर दखल समितीने घेतली. अनुसूचित जमातींच्या जात प्रमाणपत्रावर नोकरी मिळविलेले इतर जातींचे बोगस उमेदवार, आरक्षित जागेवर नियुक्ती असतानाही जातवैधता सादर न करता रुजू करून घेण्याचा नियमबाह्य प्रकार शिक्षण विभागात घडला. त्यामुळे पात्र जमातींच्या उमेदवारांच्या जागेचा लाभ बोगस उमेदवारांनीच घेतला. हा संपूर्ण प्रकार समितीच्या भेटीत उघड झाला. त्याला जबाबदार असलेल्यांसह शिक्षकांवर कारवाई करण्याचे आदेश समितीने जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार काय केले, या बाबीची माहिती घेण्यासाठी समितीने जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची आधी ३ मे त्यानंतर २१ जून रोजी सुनावणी ठेवली. ती पुढे ढकलल्यानंतर आता ५ जुलै रोजी होत आहे. शिक्षण विभागातील अनुसूचित जमातींच्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात कारवाई प्रस्तावित असलेल्यांमध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह शिक्षणाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामध्ये २००१ ते २००६ या काळातील भरतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सीमा व्यास, बी.आर. पोखरकर यांची नावे आहेत, तर प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांमध्ये के.एम. मेश्राम, संजय गणोरकर, प्रकाश पठारे यांची नावे आहेत. इतर अधिकाऱ्यांवर कारवाईबाबत आता समिती कोणते निर्देश देते, हे लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मानीव दिनांकासह अनेक प्रकरणेसमितीपुढे होणाऱ्या सुनावणीत सुनंदा गेडाम यांना पदोन्नतीचा मानीव दिनांक देण्यासाठी संजय महागावकर, जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी एस.पी. सोनकुसरे यांचा मानीव दिनांक रद्द करण्याच्या आदेशाचा समावेश आहे; मात्र याप्रकरणी मानीव दिनांक रद्दच्या आदेशाला आव्हान देत सोनकुसरे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्याची माहिती समितीपुढे ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी संबंधितांची विभागीय चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे.