उपवासाला काय खावे?
उपवास म्हटले, की बहुतांश लोक साबुदाण्याची उसळ, पॅटीस, साबुदाणावडा आदी पदार्थांचे सेवन करतात. या पदार्थांच्या सेवनामुळे भूक लागत नाही. परिणामी पचनशक्तीही सुधारण्यास मदत होत नाही. त्यामुळे उपवासाच्या दिवशी हे पदार्थ खाणे टाळलेले बरे. उपवासाला शक्यतो विविध फळे, नारळपाणी, चिक्की (गूळपट्टी) भगर आदी पदार्थ खावेत. त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचेही आहारतज्ज्ञ सांगतात.
आराेग्याला हानीकारक
साबुदाण्यात कार्बोहायड्रेट उच्च प्रमाणात असतं. त्यामुळे याचं जास्त सेवन हे तुम्हाला मधुमेहाचा आजार देऊ शकतं.
यामध्ये कॅलरीचं चांगलं प्रमाण असतं, जे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण याचं अधिक सेवन केल्यास, तुम्हाला लठ्ठपणासारखे आजारही होतात.
साबुदाण्यातील कॅल्शियमुळे हाडांच्या समस्येप्रमाणेच मुतखड्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे अतिसेवन करणं टाळा.
छातीत जळजळ, उलटी, रक्ताचा विकार, डोकेदुखी आणि थायरॉईडसारखे आजारही साबुदाण्याच्या अतिसेवनाने होतात.
असे आहेत भाव
भगर १३०..१००
साबुदाणा ६८ ६०
नायॅलान साबुदाणा ८० ६०
श्रावणातील व्रतवैकल्यामुळे भाव वाढ
महिनाभरापूर्वी साबुदाणा, शेंगदाणे, भगर, नाॅयलान साबुदाणा याचे भाव कमी हाेते. आता श्रावण महिना सुरू झाल्याने व्रत, उपवासांचे प्रमाण वाढले असल्याने या पदार्थांना मागणी वाढली अन् भावातही वाढ झाली आहे.