यावेळी ठाणेदार राहुल वाघ यांनी स्त्रियांच्या हिताची जपणूक करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष लता चव्हाण यांनी आपल्या प्रास्तविक भाषणामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगतीची कास धरून स्त्रियांना समान हक्क मिळावे यासाठी प्रत्येक स्त्री व पुरुषांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. सदरच्या कार्यक्रमाला सर्व महिला पोलीस पाटील, महिला पोलीस कर्मचारी पूजा चौधरी, विजया चौरपगार,हेड कॉन्स्टेबल महादेव देशमुख ,बिट अंमलदार आदिनाथ गाठेकर, बाळू येवले,भगवंत शिंदे, रावसाहेब बुधवंत पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. संचालन महिला पोलीस कर्मचारी पूजा चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन चतारी येथील पोलीस पाटील विजय सरदार यांनी केले.
फोटो: