अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमध्ये तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागातर्फे लिफ्ट बसविण्यात आली होती. त्यावेळी यशस्वी चाचणीही करण्यात आली होती; मात्र सुरक्षा प्रमाणपत्राअभावी अद्यापही ही लिफ्ट सुरूच झालेली नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमावलीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयामध्ये तीन लिफ्ट प्रस्तावित होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने त्यापैकी दोन लिफ्ट २०१६ मध्ये बसविण्यात आल्या होत्या. यातील एक लिफ्ट सुरू असली, तरी प्रशासकीय इमारतीमधील लिफ्ट बसविल्यापासून सुरूच झाली नाही. ही सेवा सुरू होऊन तीन वर्षे झाली; पण विद्यार्थी व अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याचा उपयोग करता येत नाही. विद्यार्थ्यांसह दिव्यांगांची पायºया चढताना होणारी कसरत लक्षात घेता मेडिकल कॉलेज प्रशासनाकडून लिफ्ट सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.या विभागांना ‘लिफ्ट’मुळे सुविधातळमजल्यावर असणारी ही लिफ्ट सुरू झाल्यास पहिल्या माळ्यावर वैद्यकीय अधीक्षक, उपअधीक्षक यांचे व औषधवैद्यक शास्त्र (मेडिसिन) विभाग आहे. दुसºया माळ्यावर न्यायवैद्यकशास्र तर तिसºया माळ्यावर ग्रंथालय आहे. येथे ये-जा करणाºया विद्यार्थ्यांसह वैद्यकीय अधीक्षकांकडे जाणाºया रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो.प्रशासकीय इमारतीमधील लिफ्ट बसविण्यात आली, तरी तिचा वापर अद्याप झालेला नाही. तांत्रिक कारणांमुळे ही लिफ्ट बंद असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करणार आहोत.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.