अतुल जयस्वाल अकोला, दि. 0७-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्नित असलेल्या सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभागावरच उपचार करण्याची वेळ आली आहे. कोणत्याही रुग्णालयातील अतिदक्षता विभाग हा बाहेरच्या अशुद्ध हवेला अटकाव करण्यासाठी काचबंद व वातानुकूलित असावा, असा दंडक आहे. सवरेपचार रुग्णालयातील अतिदक्षता विभाग मात्र या नियमाला अपवाद ठरत आहे. दार व खिडक्या सताड उघड्या असतात. परिणामी बाहेरची दूषित व रोगजंतूयुक्त हवा सरळ आतमध्ये शिरते. त्यामुळे अतिदक्षता विभागातील रुग्णांना जंतूसंसर्ग होण्याची शक्यता आहे.सवरेपचार रुग्णालयात दाखल होणार्या गंभीर आजारांच्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवले जाते. या रुग्णांना चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवता यावे व वातावरणातील अशुद्ध हवा व रोगजंतूंच्या संपर्कात रुग्ण येऊ नये यासाठी ही व्यवस्था आहे. येथील अतिदक्षता विभाग २0 खाटांचे असून, ते नेहमीच रुग्णांनी गजबजलेले असते. अतिदक्षता विभागात इतर सुविधा असल्या तरी येथील वातानुकूलित यंत्रणा अपुरी पडत आहे. परिणामी उपलब्ध वातानुकूलित यंत्रांवर भार येऊन ते वारंवार निकामी होतात.विभागाला लागूनच घाणीचे साम्राज्यया विभागाला लागूनच मोकळी जागा आहे. या जागेवर रुग्णाचे नातेवाईक उरलेले अन्न व कचरा टाकतात. पावसामुळे सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. यामुळे बाहेरची दुर्गंधी विभागात पसरते. याचा त्रास विभागातील गंभीर रुग्णांना होत आहे.अतिदक्षता विभागाचा हॉल मोठा असून, वातानुकूलन यंत्रांची संख्या कमी आहे. त्यामुळे ही यंत्र वारंवार नादुरुस्त होतात. सध्या अनेक वातानुकूलन यंत्रे निकाली झालेली आहेत. त्यामुळे खिडक्या उघड्या असतात. परंतु, रुग्णांना जंतूसंसर्ग होऊ नये, यासाठी दक्षता घेतली जाते. - डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आयसीयुमधील रुग्णांना जंतूसंसर्गाचा धोका!
By admin | Published: October 08, 2016 3:08 AM